प्राणघातक हल्ल्यात युवक गंभीर

0
62

मालभाटमधील हल्लेखोरांना अटक

मालभाट-मडगाव येथे काल रात्रौ उशिरा जुन्या वैमनस्यांतून पाच जणांच्या गटाने परेश ज्ञानेश्‍वर वेळुसकर (२१) या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिसियू इस्पितळात दाखल केले आहे.

मडगाव पोलिसांनी सुनील कुमार सिंग (उत्तर प्रदेश), सुरेश शंकर बाबू (केरळ), लक्ष्मण थापा (नेपाळ), सुदिपकुमार सिंग (उत्तर प्रदेश), विवेक दुबे (उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. केळुसकर गट व मारहाण करणारा गट एका बार व रेस्टॉरंटमध्ये काम करीत होते. आता दोन्ही गट वेगळे झाल्यानंतर जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला. सुरी हल्ल्याने तोंडावर व हातावर जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यात केळुसकरचा मोबाईल व रोख दोन हजार रुपये गहाळ झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.