प्रसाद लोलयेकरांनाही कारवाईचा इशारा

0
17

केंद्रीय गृहमंत्रालयाने आयएएस अधिकारी संजीत रॉड्रीगीस यांच्यानंतर आणखी एक आयएएस अधिकारी प्रसाद लोलयेकर यांना बदलीच्या ठिकाणी त्वरित रुजू होण्याचा आदेश दिला असून, ह्या आदेशाचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गोव्यात कार्यरत असलेले आयएएस अधिकारी प्रसाद लोलयेकर यांची 12 सप्टेंबर 2024 रोजी अंदमान आणि निकोबार येथे बदली केली. तथापि, अजूनपर्यंत लोलयेकर हे बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे अवर सचिव राकेश कुमार सिंग यांनी 16 मे 2025 रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. प्रसाद लोलयेकर यांनी पंधरा दिवसात बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यात बढती रोखणे व इतर प्रकारची कारवाई केली जाऊ शकते, असे आदेशात म्हटले आहे.