प्रशांत भूषण यांनी दुरुस्त्या करून आपणाला सादर केलेला लोकायुक्त विधेयकाचा मसुदा आपण अद्याप पाहिला नसल्याचे काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडण्यात येईल की काय याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी पर्रीकर म्हणाले की, अर्थसंकल्पाच्या कामात मी सध्या एवढा व्यस्त आहे की अन्य कुठेही लक्ष घालणे सध्या शक्य होत नाही.
अर्थसंकल्पाच्या कामातून मुक्त झाले की लोकायुक्तच्या दुरुस्त्यांवर लक्ष टाकणार असल्याचे ते म्हणाले. दुरुस्ती केलेले लोकायुक्त विधेयक नव्याने अधिसूचित करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

