Home बातम्या प्रतिकूल हवामानाचा मच्छीमारीला फटका

प्रतिकूल हवामानाचा मच्छीमारीला फटका

0

यासंबंधी मच्छीमारी खात्याच्या संचालक डॉ. शामिला मोंतेरो यांना विचारले असता त्या म्हणाल्या, की अरबी समुद्रात सध्या वादळसदृश्य स्थिती असून समुद्रात जोरदार वारे वाहत आहे. हवामान खात्याने मच्छीमाराना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

परिणामी काल गोव्यातील बहुतेक मच्छीमारी जेटींवरून ट्रॉलर्स मच्छीमारीसाठी समुद्रात उतरलेच नसल्याचे त्या म्हणाल्या. केवळ वास्को जेटीवरून अवघेच काही ट्रॉलर्स मच्छीमारीसाठी गेल्याची माहिती आपणाला मिळाल्याचे त्या म्हणाल्या. समुद्रात वादळ आलेले असल्याने आजही ट्रॉलर्स मच्छीमारीसाठी समुद्रात उतरले नसल्याचे त्यांनी काल सांगितले.