प्रकाशयोजनेतील त्रुटींबाबत अहवाल सादरीकरणाची सूचना

0
3

गोवा कला अकादमीच्या मुख्य थिएटरमध्ये गेल्या रविवारी ‘पुरुष’ या नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळी प्रकाशयोजनेमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाबाबत अहवाल सादर करण्याची सूचना कला अकादमीच्या सदस्य सचिवांना करण्यात आली आहे, अशी माहिती कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली.

तांत्रिक बिघाडामुळे प्रकाशयोजनेमध्ये व्यत्यय आला असण्याची शक्यता आहे चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत अधिक भाष्य केले जाऊ शकते, असे गावडे यांनी सांगितले. कला अकादमीमध्ये कोणत्याही समस्येशिवाय मराठी नाटक आणि नाट्य स्पर्धा पार पडल्या आहेत. कला अकादमी अजूनही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहे, याचाही मंत्री गावडे यांनी आवर्जून उल्लेख केला.

दरम्यान, कला अकादमीमध्ये नाटक सुरू असताना प्रकायोजनेतील तांत्रिक बिघाडानंतर नाट्यरसिक आणि विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका होत आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.