Home बातम्या पोस्टाच्या कारभारामुळे नोकरीची मुलाखत हुकली

पोस्टाच्या कारभारामुळे नोकरीची मुलाखत हुकली

0

पेडणे येथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नागझर येथे पत्र पोहोचण्यास एक महिन्याचा कालावधी लागल्याने नागझर येथील एका होतकरू युवकाला सरकारी नोकरीची मुलाखत हुकली.

नागझर येथील नीलेश मांद्रेकर याला २२ ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती जमाती खात्यातर्फे वाहन चालक पदाच्या मुलाखतीसाठी पत्र पाठविण्यात आले. हे पत्र पणजीहून दि. २४ ऑगस्ट रोजी पेडणे येथे पोस्टात पोहोचले. त्याबाबतचा स्टॅपही पत्रावर आहे. मात्र तब्बल एक महिन्यानंतर दि. २४ सप्टेंबर रोजी आपल्याला पत्र मिळाले, असे नीलेशचे म्हणणे आहे. मुलाखत ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वा. होती. हे पत्र पहाताच त्या युवकाला जबर धक्काच बसला. कारण संबंधीत खात्याने हे पत्र २२ ऑगस्ट रोजी पोस्टात घातले होते.