Home Featured पोलीस मुख्यालयात ‘ते’ 31लॅपटॉप जमा करण्याचे आदेश

पोलीस मुख्यालयात ‘ते’ 31लॅपटॉप जमा करण्याचे आदेश

0

गोवा पोलिसांना सीएसआरअंतर्गत 31 लॅपटॉप देणाऱ्या वैभव ठाकर (महाराष्ट्र) याला मुंबई पोलिसांनी एका फसवणूक प्रकरणात अटक केल्यानंतर काल पोलीस प्रशासनाने राज्यातील पोलीस स्थानकांना देण्यात आलेले 31 लॅपटॉप पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले.

गोव्यातील पोलीस स्थानकांना लॅपटॉप देणाऱ्या वैभव ठाकर याला मुंबई पोलिसांनी फसवणूक प्रकरणात अटक केल्याच्या वृत्तानंतर पोलीस खात्याला देण्यात आलेल्या लॅपटॉप विषयावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ते 31 लॅपटॉप संबंधित पोलीस स्थानकांना परत करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

गेल्या एप्रिल 2025 मध्ये पोलीस खात्यासाठी 31 लॅपटॉप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी वैभव ठाकर याला एका सराफी व्यावसायिकांची सुमारे 2.8 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करून व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे.