पणजीत स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्यावेळी अचानक भोवळ येऊन कोसळलेले गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची प्रकृती सुधारली असून त्यांना गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे पोलीस सूत्रानी सांगितले. पणजीत जुन्या सचिवालयाजवळ गोवा सरकारच्यावतीने आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्याला उद्देशून भाषण करीत असताना आलोक कुमार मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठाजवळ हजर असताना नंतर अचानक भोवळ येऊन कोसळलेे होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ गोमेकॉत हलवण्यात आले होते.

