पोलीस खात्यातील रेकॉर्डस्ल वकरच होणार डिजिटाईझ

0
31

>> गोवा पोलिसांचा फायर ब्लॉकचेनशी करार

पोलीस खात्यातील रेकॉर्डस् डिजिटाईझ करण्याचे काम लवकरच सुरू होणार असून, हे काम वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभाग शाखेचे अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. एकदा हे रेकॉर्डस् डिजिटाईझ करण्याचे काम पूर्ण झाले की, खात्याच्या कामात पारदर्शकता येण्याबरोबरच सर्व कारभार कागदमुक्त (पेपरलेस) होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या कामासाठी काल गोवा पोलीस व फायर ब्लॉकचेन कंपनीशी सामंजस्य करार झाला. काल रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण पोलीस विभागाच्या कार्यालयात हा करार झाला. पोलीस खात्याच्या वतीने अधीक्षक निधीन वाल्सन, तर फायर ब्लॉकचेन कंपनीच्या वतीने संस्थापक व सीईओ प्रतीक गौरी यांनी करारावर सह्या केल्या.

फायर ब्लॉकचेन ही देशातील स्टार्टअप क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची कंपनी आहे. मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून ही स्टार्टअप सुरू करण्यात आली आहे. ही कंपनी रेकॉर्डस् डिजिटाईझ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करणार आहे, असे वाल्सन यांनी सांगितले.

हे रेकॉर्डस् डिजिटाईझ झाल्यानंतर नागरिकांना चांगली सेवा मिळू शकणार आहे. हे रेकॉर्डस् डिजिटाईझ झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने तपासकामाच्या रेकॉर्डस्‌चेही डिजिटायझेशन होणार असल्याचे वाल्सन यांनी सांगितले.