सुमारे ३७ लाख रुपये खर्चून पोलीस दलाने आणलेल्या वाहने उचलून नेण्याच्या क्रेन्स बिनवापर पडून असल्याने सरकारला नुकसानी झाल्याचे सार्वजनिक लेखा समितीच्या अहवालात दाखवून दिले आहे.
वरीलपैकी १ क्रेन्स फेब्रुवारी २००२ मध्ये तर दुसरी मार्च २००४ मध्ये खरेदी केली होती. फेब्रुवारी २००२ मध्ये आणलेल्या क्रेन्सची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पोलीस खात्याने सरकारला दिला होता. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या एक क्रेन्स फर्मागुडी येथील पोलीस ठाण्यावर तर दुसरी क्रेन वेर्णे पोलीस स्थानकावर पडून आहे. क्रेनसाठी नियुक्त केलेले चालक व अन्य कर्मचार्यावर ९ लाख ६१ हजार रुपये खर्च केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.