पोलिसांसाठीच्या मेडिक्लेम योजनेचे नूतनीकरण रखडले

0
12

पोलीस कर्मचार्‍यांसाठीच्या मेडिक्लेम या ग्रुप विमा योजनेमधील विमा हप्त्यामध्ये वाढ करण्यात आल्याने मेडिक्लेम योजनेचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. या प्रकारामुळे पोलीस कर्मचार्‍यांत खळबळ उडाली आहे.गोवा पोलीस कल्याण सोसायटीकडून पोलीस कर्मचार्‍यांसाठी खास मेडिक्लेम योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेची वर्ष २०२१-२०२२ ची मुदत २८ जून २०२२ मध्ये पूर्ण झाली आहे. या योजनेची मुदत वाढविण्याची गरज होती. तथापि, विमा कंपनीने हप्त्यामध्ये वाढ केल्याने मेडिक्लेम योजना तूर्त स्थगित ठेवण्यात आली आहे.

या योजनेचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. याबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. या योजनेखाली पोलीस कर्मचार्‍यांना विमा कवच मिळत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी लक्ष घालून विमा योजनेचे नूतनीकरण करून घ्यावे, अशी मागणी केली जात आहे.