पोलिसांकडून देऊ चोडणकरांची सात तास जबानी

0
51
फेसबुकवरून लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कमेंट पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हे नोंद झालेले देऊ चोडणकर हे काल सायबर क्राईम पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांनी सुमारे ७ तास त्यांची जबानी घेतली. तसेच त्यांचा लॅपटॉप व हार्डडिस्क ताब्यात घेतली.

चोडणकर हे काल सकाळी ११ च्या दरम्यान पोलिसांसमोर हजर राहिले. पोलिसांनी ११ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्यांची जबानी घेतली. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनल्यास दक्षिण गोव्यातून ख्रिस्ती नामशेष होतील असा कमेंट देऊ यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर अतुल पै काणे यांनी देऊ चोडणकर यांच्याविरुद्ध सायबर पोलिसांत तक्रार नोंदवली होती.