पोर्तुगीज विदेश मंत्री गोवा दौर्‍यावर

0
44

पोर्तुगालचे विदेश मंत्री पावलू पोर्ताश हे गोवा दौर्‍यावर आलेले असून आज गुरुवार दि. ७ रोजी ते सकाळी ९ वा. ते सकाळी ९.३० वा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेऊन चर्चा करणार आहेत. नंतर सकाळी १० वा. ते राजभवनवर जाऊन राज्यपाल भारतवीर वांच्छू यांची भेट घेऊन चर्चा करतील.

नंतर ते ११ वाजता जुने गोवे येथील चर्चेसमध्ये जातील. तद्नंतर संध्याकाळी ४ वाजता ते आल्तिनो येथील आर्चबिशप पॅलेसमध्ये जाऊन आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांची भेट घेतील. नंतर ५ वा. ते गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिजच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करतील. नंतर ६ वा. ते रेईश मागूस किल्ल्यावर जाण्यासाठी पणजीतून रवाना होतील.