27.2 C
Panjim
Monday, April 19, 2021

पोटाचा वाढता घेर ः सतत बोचणारी समस्या

 • डॉ. मनाली म. पवार
  (सांतइनेज पणजी)

चरबी पातळ करण्यासाठी गरम पाण्याला खूप महत्त्व आहे. पाणी चांगले कटू, तिक्त द्रव्यांनी सिद्ध केलेले प्यावे. नित्य गरम पाणी प्यायल्याने (पाणी प्यावयाचे वेळी गरम हवे) महिन्याकाठी एक- ते दोन किलो वजन कमी होते आणि कोणत्याही प्रकारे अशक्तपणा न येता हे घडते.

कोरोना महामारी, लॉकडाउन, वर्क फ्रॉम होम या सगळ्या टप्प्यांतून जाता- जाता एक वर्ष उलटलं. यात चांगली गोष्ट जर काय घडली असेल तर अपघाती मृत्युदर मी झाले व एकंदरित इतर व्याधींमध्येही लाक्षणिक घट दिसून आला. मुलांची आजाराची कुरबुरही बर्‍यापैकी कमी झाली पण तरीही अनेकांच्या मते लठ्ठपणात वाढ झालेली आहे. घरचं खाऊनसुद्धा लठ्ठपणा कसा काय वाढला? हॉटेलचं- बाहेरचं खाणं पूर्ण बंद असूनही पोटाचा घेर कसा वाढला असा बर्‍याच जणींना प्रश्‍नही पडला असेल. फक्त ‘खाणे’ हे एकच लठ्ठपणाचे कारण आहे का? नाही..! तुम्ही कुठे खाता यापेक्षाही काय खाता हे तेवढेच महत्त्वाचे आहे व कधी खाता हे त्यातूनही महत्त्वाचे आहे.

तुम्ही घरात बनवून पदार्थ खाल्ले… मान्य…पण काय खाल्लं? सुपर मार्केट, इतर दुकानात केक बनवण्याच्या साहित्याची मागणी वाढली. पिझ्झा बनवण्याच्या साहित्यात वाढ झाली. फेसबुक, युट्यूबवर नुसते केक, पिझ्झा बनवण्याचे क्लासेस. का? मागणी तसा पुरवठा. मग घरातलं अन्न खाल्लं तरी संतुलित आहार सेवन केलात का? तुम्ही काय खाल्लं व कधी, किती खाल्लं याचा विचार करा. घरात आपण व्यायाम किती केला याचा विचार करा. झोप किती व कशी घेतली याचा विचार केला तर आपल्या पोटाचा घेर का वाढला याचे उत्तर नक्की मिळेल.

लठ्ठपणा वाढण्याच्या कारणांमागे गुरु, मधुर, शीत, स्निग्ध इत्यादि पदार्थांचे अतिप्रमाणात भक्षण करणे म्हणजेच कफकर, मेद्य पदार्थांचे सेवन, दिवसा झोपणे व व्यायामाचा अभाव असणे असा उल्लेख आयुर्वेदशास्त्रात आढळतो. वरील सर्व कारणांनी पुरुष हा डुकराप्रमाणे चरबी साठून लठ्ठ होतो, असे वर्णन शास्त्रकारांनी सांगितले आहे.
आपण जे काही खातो, त्या आहाराचे आहार रसात रूपांतर होते. रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसधातूपासून पुढे मेद, मेद धातूपासून अस्थि, अस्थिधातूपासून मज्जा व मज्जाधातूपासून पुढे शुक्र असे सात धातू आपण घेतलेल्या आहारातून प्राप्त होतात किंवा त्यांचे पोषण होते. जर आपला आहारच कफकर किंवा मेद्य (साखरयुक्त), मैदायुक्त, विकृत दुग्धजन्य पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड अशा प्रकारचा असल्यास मेदधातूचा अग्नि तो मेदा(चरबी)चे पचन करु शकत नाही. मग ही चरबी तशीच मेदधातूच्या स्थानात म्हणजे पोटावर, स्तनांवर, कुल्ल्यांवर किंवा मांड्यांवर साठत जाते व लठ्ठपणा वाढतो. इथेच मेदधातूचा स्रोतोरोध होतो व पुढच्या धातूंना पोषण होत नाही. म्हणून हाडे ठिसूळ होतात व शरीर लबलबीत होते. त्याचप्रमाणे मेदोवह स्रोतसाच्या अवरोधाने वायुच्या मार्गातही अडथळा निर्माण होऊन वायु विमार्गग होतो व जाठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे खाल्लेल्या आहाराचे लगेच पचन व शोषण होते व त्यामुळे अधिकच खाण्याची इच्छा उत्पन्न होते. या अधिक आहाराने पुन्हा अधिक मेदाची वृद्धी होते व त्यातून पुन्हा स्रोतोरोध वगैरे विषचक्र अव्याहत चालू राहून शरीरातील मेदसंचिती अधिकाधिक वाढतच जाते. यालाच लठ्ठपणा किंवा चरबी वाढणे म्हणतात.

ही वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काय कराल?

 • चरबी कमी करणे म्हणजे वजन कमी करणे नव्हे! लगेच डाएटिंग सुरू करु नये. जेवण-खाण कमी केलं, एक वेळचं जेवणे, फक्त सूपच (तरल पदार्थ) खाणे, फक्त सॅलाड खाणे म्हणजे डाएट नव्हे! याने लठ्ठपणा कधीच कमी होत नाही. उलट धातूदौर्बल्य येऊन थकवा जाणवतो व पुढचा डाएट प्लान फसतो. त्यामुळे चरबी कमी करताना आपल्या रोजच्याच आहारात थोडासा बदल करावा. रसांपासून शुक्रधातूपर्यंत सर्वच धातुंच्या पोषणाकरिता संतुलित आहार हा हवाच. त्यामुळे आहार हा सहाही रसांनी युक्त- त्यात भात, ज्वारी, बाजरीसारखे घनपदार्थ, सूप, यूष, आमटीसारखे तरल पदार्थ, सॅलॅडसारखे तोंडीलावणे, फायबरयुक्त भाज्या, रुचि वाढवण्यासाठी लिंबाचे/हळदीचे/ आवळ्याचे लोणचे इत्यादि. म्हणजे डाएट हा खाऊनच करावा. पण मनाला प्रिय असा, योग्य प्रमाणात, योग्य वेळेवर व संतुलित असावा.
 • आहारामध्ये कफधातुवर कार्य करणारी द्रव्ये उदा. काळी मिरी, लवंग, हळद, तमालपत्र, मेथी, कढीपत्ता, जीरे, धने, मोहरी, हिंग अळी तिखट स्वरूपात द्रव्ये वापरावीत.
 • आहारात वापरण्याची द्रव्ये ही पचनास जड परंतु ज्यामध्ये सारभाग कमी अशी असावीत. यव, कुलत्थ, नाचणी, वरी, बाजरी यांचा उपयोग करावा.
 • पडवळ, दुधीभोपळा, दोडका, तोंडलीची भाजी
 • यथेच्छ ताक प्यावे. ताक जिरेपूड घालून प्यावे किंवा लसणाची फोडणी देऊन प्यावे.
 • भात मात्र मोकळा, शीतं सुटी- सुटी असावी. कुकरमधील चिकट भात क्लेदनिर्मिती करतो व पर्यायाने मेदसंचिती वाढवतो.
 • ताकामध्ये पिप्यतिचूर्ण, जिरा, कढीपत्ता, सैंधव घालून प्यावे.
 • लाजामण्ड किंवा सकाळी नाश्त्याला लाह्यांमध्ये पाणी घालून चवीपुरते मध घालून खावे.
 • कडधान्यामध्ये मूग पथ्यकर आहे. मुळे मुगाचे कढण, मुगाचे सूप प्यावे.
 • चरबी पातळ करण्यासाठी गरम पाण्याला खूप महत्त्व आहे. पाणी चांगले कटू, तिक्त द्रव्यांनी सिद्ध केलेले प्यावे. नित्य गरम पाणी प्यायल्याने (पाणी प्यावयाचे वेळी गरम हवे) महिन्याकाठी एक- ते दोन किलो वजन कमी होते आणि कोणत्याही प्रकारे अशक्तपणा न येता हे घडते.
 • दही खाताना दह्यामध्ये गूळ घालून खावे.
 • कफ कमी करण्यासाठी गूळाचा वापर करावा. कारण जरी साखर व गूळ दोन्ही जरी उसापासून तयार होत असले तरी साखरेत फॉस्फोरस नसते पण गूळात मात्र प्रचूर मात्रेत फॉस्फोरस आढळते. गुळाचे पचन झाल्यावर शेवटी फॉस्फोरस (क्षार) तयार होते जे उदरातील ऍसिडला न्युट्रलाइज करते. साखर इतर पदार्थांना त्रास करून शेवटी पचते. गूळ इतर पदार्थांना पचवते. मग विचार करा- मैदा, साखर, क्रीम, कृत्रिम पदार्थांपासून तयार केलेले केक यांचे रूपांतर कशात होणार??
  शेंगदाण्याचे लाडू, गूळ-खोबर्‍याचे लाडू, तिळाचे लाडू, मुगाचे लाडू इ. या वर्षभरात किती जणांच्या घरात बनले? व ज्यांच्या घरात बनले त्यांच्या घरातील मंडळींची पोटं सुटली का? नाहीच सुटणार. कारण गुळाबरोबर तीळ, शेंगदाणे खाणे हे कफासाठी हितकरच आहे. कारण यातून शेवटी क्षारीय पदार्थ निर्माण होतो व तीळ- शेंगदाण्यामध्ये तेल असते ते वातदोष कमी करायला उपयुक्तच असते व आधुनिक भाषेत सांगायचे झाल्यास तीळ शेंगदाण्याचे तेल हे एचडीएलपूरक आहे. कोलेस्टरॉल वाढवत नाही. म्हणून चरबी कमी करण्याची इच्छा असल्यास जेवण झाल्यावर एक चमचा रोज काळे तीळ खावेत. गरमीमध्ये खाऊ नयेत.
 • चरबी कमी करण्यामध्ये मध हे अग्र्यद्रव्य आहे. हे लेखनद्रव्य आहे. सकाळी उठल्यावर त्रिफळा चूर्ण मधाबरोबर घेतल्यास लाभ होतो.
  सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये (गरम नव्हे) मध व लिंबाचा रस घालून पाणी पिण्याने लाभ होतो.
 • सुंठ हे द्रव्यही चरबी पातळ करण्यास मदत करते. आले सुकल्यावर त्याची सुंठ होते व गुण वाढतात. सुंठ व गुळ खाल्ल्याने फायदा होतो.
 • पूर्वी जेवल्यानंतर पान (तांबुल सेवन) खाण्याची पद्धत होती. कारण जेवल्यानंतर खाल्लेले अन्न नीट पचावे या हेतूनेच होते. लठ्ठपणा कमी करायचा असल्यास खायचे पान, सुंठ, गूळ, बडीशेप, लवंग, गुलकुंद वापरून खावे.
  औषधी चिकित्सेपेक्षा पथ्यापथ्यालाच या रोगात अधिक महत्त्व असल्याने वरील आहारीय द्रव्यांचा विचार करून आपल्या खान-पानामध्ये अवश्य बदल करून पहा. पोटावरची म्हणा किंवा जिथे- जिथे चरबी वाढली आहे ती नक्की कमी होईल. आहाराबरोबर पोटाचे व्यायाम कपालभाती, पवनमुक्तासन, नौकासन, सर्वांगासन इत्यादींचा जरूर अवलंब करावा.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

कोरोना लसीकरण घ्यावे का?

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज) या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात...

थर्टीन

लेख- १३ बायोस्कोप प्रा. रमेश सप्रे ‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ...

अनासक्तीचा आदर्श ः ‘कमळ’

योगसाधना - ५००अंतरंग योग - ८५ डॉ. सीताकांत घाणेकर शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ...

क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर) या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा ओलावा कमी होतो, घामावाटे, मूत्रावाटे व काही प्रमाणात मलावाटे शरीरातून...