पेपरफुटी प्रकरणी काँग्रेसकडून युवकांची दिशाभूल ः दामू

0
7

काँग्रेस पक्षाकडून नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या विषयावरून युवकांची दिशाभूल केली जात आहे. केंद्र सरकारने युवा वर्गासाठी केलेले चांगले कार्य संसदेतील चर्चेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न चालविला आहे, असा आरोप काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.

केंद्र सरकारने नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामध्ये आवश्यक कारवाई केलेली आहे. गोवा भाजप या कारवाईचे समर्थन करीत आहे, असेही दामू नाईक यांनी सांगितले. देशात गेल्या 15 वर्षापासून प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडत आहेत. केंद्र सरकारने प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध जलद गतीने कारवाई करण्यासाठी जलद न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे, असे बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. यावेळी आमदार रूडाल्फ फर्नांडिस यांची उपस्थिती होती.