पेट्रोल व डिझेलच्या दरात काल प्रती लिटर अनुक्रमे ९१ व ८४ पैशांनी कपात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल दरात घसरण झाल्याने ही कपात झाली आहे. काल मध्यरात्रीपासून या कपतीची अंमलबजावणी झाली. दिल्लीत आता पेट्रोल प्रती लिटर ६३.३३ रुपये तर मुंबईत ७०.९५ रुपये होणार आहे. डिझेलचा दर आता नवी दिल्लीत प्रती लिटर ५२.५१ रुपये व मुंबईत ६०.११ रुपये असा होईल.

