पेट्रोलच्या किमतीत काल मध्यरात्रीपासून प्रति लिटर ८५ पैसे दरकपात करण्याचा निर्णय घेतला. ही दरकपात स्थानिक कर व व्हॅट वगळून असेल. व्हॅट धरून ही कपात दिल्लीत प्रति लिटर सुमारे १.०२ रु. होते. त्यामुळे दिल्लीत ६८.३४ रु. लिटर दरावरून ६७.२९ रु. लिटर एवढा दर होईल. १६ मार्च रोजी २ रु. प्रति लिटर एवढी पेट्रोल दरकपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय तेलबाजारपेठेतील दरांच्या आढाव्यानंतर भारतीय तेल महामंडळाने दरकपातीचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत रु. ३ कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मर्यादित अनुदानित सिलिंडर्स घेऊन झाल्यानंतरच्या सिलिंडर्सना ही दरकपात लागू होईल.

