एका महिन्यादरम्यान तिसरी दरकपात करताना तेल कंपन्यांनी काल पेट्रोलची किंमत प्रति लिटर एक रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ काल मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठेत घटलेल्या दरामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल महामंडळातील सूत्रांनी सांगितले. ही दरकपात व्हॅट व स्थानिक विक्री कर वगळून असेल. फेरबदलानंतर दिल्लीत प्रति लिटर पेट्रोलची किंमत रु. ६७.२९ वरून ६६.०९ इतकी झाली आहे.
भारतीय तेल महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत ११९.२३ डॉलर्सवरून ११६.६१ डॉलर्स इतकी झाली आहे. दरम्यान, डिझेलवर मात्र महामंडळाला रु. ६.४८ प्रति लिटर नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले.

