Home बातम्या पेट्रोल महागले

पेट्रोल महागले

0

पेट्रोलच्या दरात सहा आठवड्यांनंतर चौथ्यांदा तेल कंपन्यांनी वाढ करून सर्वसामान्यांवर बोजा टाकला आहे. यावेळी प्रती लिटर १ रुपये ५५ पैसे अशी वाढ झाली आहे. काल मध्यरात्रीपासून अंमलबजावणी झालेली ही दखल स्थानिक विक्री कर व मूल्यवर्धित कर वगळून आहे. प्रत्यक्षात ही दरवाढ प्रत्येक शहरानुसार बरीच जास्त होणार आहे.

नव्या दरवाढीनुसार दिल्लीत पेट्रोल दरवाढ रु. १.८६ अशी असेल. त्यामुळे आधीच्या रू. ६८.५८ ऐवजी रू. ७०.४४ असा प्रती लिटर पेट्रोलचा दर होईल. जूननंतर ही चौथी दरवाढ आहे. मात्र यावेळी डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही.