पेट्रोल पंप रात्रीचे बंद ठेवण्यास विरोध प्रदर्शित झाल्यावर काल तेल मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी स्पष्ट केले की, पेट्रोल पंप रात्रीचे बंद ठेवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही.
मुळात पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा प्रस्ताव सरकारचा नव्हता. ही मागणी काही लोकांकडून झाली होती. पण सरकारने कोणताही निर्णय याबाबत घेतलेला नाही.
वित्तीय तूट भरून काढण्याचा एक उपाय म्हणून सरकार तेलविक्रीवर नियंत्रण आणणार असून १६ रोजीपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पेट्रोल पंप बंद ठेवले जाणार असल्याचे वृत्त होते.