या आठवड्यात पुन्हा एकदा पेट्रोल प्रति लीटर १ रूपयाने आणि डिझेल ५० पैशांनी महागणार आहे. गेल्या दोन आठवड्यांत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लीटर १ रूपया ३२ पैशांचा अतिरिक्त तोटा सहन करावा लागत आहे.
त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीस दरवाढ घोषित करण्याचा त्यांचा इरादा आहे. डिझेलवर तेल कंपन्यांना सध्या ९ रूपये २२ पैसे प्रतिलीटर तोटा सोसावा लागत आहे. त्यामुळे त्याच्या दरातही पन्नास पैसे प्रति लीटर वाढ करण्याचा तेल कंपन्यांचा विचार आहे.

