‘शार्ली एब्दो’ या फ्रेंच व्यंगचित्र साप्ताहिकावर सशस्त्र हल्ला चढवून संपादकासह बारा जणांची हत्या करणारे दहशतवादी शरीङ्ग आणि सईद क्वॉची या दोघा बंधूंना ठार करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, या कारवाई दरम्यान दहशतवाद्यांनी वेठीस धरलेल्या नागरिकांपैकी ४ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.हल्ल्यानंतर पॅरिसच्या उत्तर-पूर्व भागात पोलीस आणि दोन दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. दोन संशयित दहशतवादी एका सुपर मार्केटच्या इमारतीत शिरले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर इमारतीला पॅरिस पोलिसांनी घेराव घालून त्यांना घेरले. तसेच इमारतीभोवती पॅरिस पोलिसांचे दोन हेलिकॉप्टर्स देखरेख करीत होते.
पोलिसांनी दोघांनाही आत्मसमर्पण करण्याचेही आवाहन केले. परंतु, सुरुवातीला कोणताही प्रतिसाद हल्लेखोर दहशतवाद्यांनी दिला नाही. पॅरिस पोलिसांनी अनेकवेळा आत्मसमर्पणाचे आवाहन केल्यानंतर अखेर दोघांनी ङ्गोनवरून पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि ‘शहीद होणे पसंत करू’ असे पोलिसांना सांगितले. यानंतर हल्लेखोर आणि पोलिसांत झालेल्या गोळीबारात पोलिसांनी हल्लेखोरांचा खात्मा केला.
हल्ल्यानंतर ङ्ग्रान्समध्ये जोरदार शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या दोन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रेही गुरुवारी जारी करण्यात आली होती. हे दोघे धोकादायक आहेत तसेच सशस्त्र आहेत, त्यांच्यापासून सावध राहावे तसेच ते कुठेही आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले होते.
शार्ली-एब्दो हल्ला प्रकरणातील दोन संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना शहराच्या ईशान्य भागात पोलिसांकडून एका संशयित कारचा पाठलाग सुरू होता. या कारमधून रस्त्यावर आणि पोलिसांवर अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला होता. त्यानंतर हे दोघाही दहशतवाद्यांनी एका इमारतीत शिरून नागरिकांना ओलिस धरले होते.

