खाण व्यवसाय बंद झाल्याने अनेक जणांच्या नोकर्या गेल्या असल्या तरी जीईएलकडे वरीलपैकी १८ जणांचे अर्ज आले आहेत.
सरकारने खाण अवलंबितांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. एक किंवा दोन ट्रक असलेल्यांसाठीच वरील पॅकेज देण्याचे सरकारने ठरविले आहे. असे असले तरी खाण व्यवसाय बंद झाल्याने संबंधित भागातील हॉटेल मालक, बार मालक यांनीही मदतीसाठी सरकार दरबारी धाव घेण्याची तयारी केली असून तसे झाल्यास पॅकेज देण्याच्या बाबतीत सरकारसमोर समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नोकर्या गेलेल्यांपैकी १८ जणांचे अर्ज
हॉटेल, बस व्यावसायिकही मदत मागण्याच्या तयारीत
सरकारसमोर समस्या निर्माण होण्याची शक्यता

