Home बातम्या पृथ्वी -२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

पृथ्वी -२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0

जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल उदिशाच्या बलसोर जिल्ह्यातील चंडीपूर रेंजवर घेण्यात आली. काल सकाळी ९.२० वा. ही बंगालच्या उपसागरात झाली व क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्य गाठले, असे सांगण्यात आले.

पृथ्वी हे पूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. ४८३ सेकंदांत ४३.५ कि.मी अंतरावरील लक्ष्य गाठण्याची क्षमता त्यात आहे. ते ५०० किलो दारुगोळा वाहून नेऊ शकते.