Home बातम्या पु. लं. च्या कथेवरील ‘चांदी’ १४ पासून

पु. लं. च्या कथेवरील ‘चांदी’ १४ पासून

0

पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर गोवेकर यांची घोषणा

पु. . देशपांडे यांच्या म्हैसया गाजलेल्या कथेवर बेतलेल्या चांदीया चित्रपटाची निर्मिती गोव्याच्या प्रभाकर फिल्मस्ने केली आहे व यात वैभव मांगले, भालचंद्र कदम, विकास समुद्रे, संतोष पवार, चेतन दळवी, दीपक शिर्के, संजीवनी जाधव, किशोरी आंबिये, किशोर नांदलस्कर असे लोकप्रिय विनोदी कलाकार आहेत. शिवाय गोव्यातील धनू डिचोलकर, प्रेमानंद नाईक, अभय जोग, लक्ष्मण पित्रे यांच्या छोट्या भूमिका आहेत. १४ जून पासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. १२ जून रोजी योगायोगाने पु. लं. ची पुण्यतिथी असल्याने हे औचित्य साधून विलेपार्ले येथील सनसिटी चित्रपटगृहात चांदीचा प्रिमिअर शो आयोजित करून प्रभाकर फिल्मस्‌तर्फे पु. लं. ना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. कला अकादमीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निर्माते आणि सहाय्यक दिग्दर्शक ज्ञानेश्वर गोवेकर यांनी काल या चित्रपटाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, या चित्रपटाला सरकारचे अनुदान नसून स्वतंत्रपणे आम्ही निर्मिती केली आहे.

चांदीच्या निमित्ताने तब्बल चाळीसेक वर्षांनंतर साक्षात पु. . रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. यात ते केवळ दिसणार आहेत असे नव्हे तर चांदीतल्या कलाकारांसोबत ते अभिनय करीत आहेत असेही पहायला मिळणार आहे. पु. लं. नी अभिनय केलेल्या जुन्या चित्रपटातील काही दृश्ये घेऊन ही किमया रुपेरी पडद्यावर अत्याधुनिक ग्राफिक्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने घडणार आहे. अशा पद्धतीने होणारा मराठीतील हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे गोव्यात चित्रीकरण करण्यात आले आहे. पटकथा, संवादलेखक अनिल पवार यांचे तर दिग्दर्शन समीर नाईक (मुंबई) यांनी केले आहे.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यासह वरील कलाकारांबरोबरच गणेश दिवेकर, प्रभाकर मोरे, आशीष राणे, संदेश उपश्याम, रूपाली भोसले, कस्तुरी सारंग, राजश्रीनिकम असे तब्बल नव्वद कलाकार भूमिका वठवित आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची नायिका एक म्हैस आहे. या म्हशीसाठी भरपूर मेहनत करावी लागली आहे असे गोवेकर यांनी सांगितले. एका एस. टी. बससमोर ही म्हैस येते आणि तिला अपघात होतो त्यातून जो कल्लोळ माजतो त्याची गम्मत यात पहायला मिळते. प्रसिद्ध कॅमेरामन समीर आठल्ये यांनी चित्रिकरण केले आहे. मीना गोविंद यांची गीते आहेत व प्रविण कुंवर यानी ती संगीतबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्माता राजेश जाधव आहेत.

दरम्यान, प्रभाकर फिल्मस्‌च्या या चांदीला सेन्सॉर बोर्डाचे यूप्रमाणपत्र मिळाल्याने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग खर्‍या अर्थाने मोकळा झाला असल्याचे गोवेकर यांनी सांगितले. ‘चांदीचे पटकथा लेखक म्हणाले, पु. लं. ची म्हैस पडद्यावर आणणे जिकिरीचे होते. निर्मात्यांना तर न्यायालयीन लढाई लढावी लागली. याकामी पु. लं. च्या नातेवाईकांचे भरपूर सहकार्य मिळाले, . भा. भारतीय चित्रपट महामंडळाच्या सगळ्या सदस्यांची मदत लाभली, असे ते म्हणाले.