‘पुलवामा’च्या पुनरावृत्तीचा कट यशस्वीपणे उधळला

0
165

 

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याचा दहशतवाद्यांचा डाव काल भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीपणे उधळून लावला. जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

जैश-ए-महंमद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या दहशतवाद्यांनी ४५ किलो स्फोटके असलेल्या एक कारमधून हा हल्ला घडविण्याचा कट रचला होता. मात्र भारतीय लष्कर, सीआरपीएफ व जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे हा कट उधळला गेला.

बुधवारी रात्री एका नाक्यावर सदर स्फोटकवाहू कारला रोखल्यानंतर कारच्या ड्रायव्हरने कार पुढे नेली. पाठलाग केल्यानंतर एका ठिकाणी कार टाकून ड्रायव्हर पळाला. मात्र संशयावरून सुरक्षा दलांनी त्या भागाला वेढले व कारवर रात्रभर नजर ठेवली. गुरुवारी सकाळी स्फोटके निकामी करणार्‍या पथकाला पाचारण करून ती कार उडवून लावण्यात आली.