Home बातम्या पुतणीच्या विनयभंगप्रकरणी अटक

पुतणीच्या विनयभंगप्रकरणी अटक

0

न्यूवाडा-वास्को येथे आपल्या पुतणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ५६ वर्षीय चुलत्यास अटक केली.

चुलत्याने आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन पुतणीस शौचालयात बोलावले व कपडे काढायला भाग पाडले. हा प्रकार नंतर तिने घरात सांगितल्यानंतर तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चुलत्यास अटक केली.

बनावट पासपोर्टप्रकरणी अटक

विमानतळ पोलिसांनी एका कारवाईत दोहा कतार येथून आलेल्या अब्दुल लतिफ या प्रवाशाला बनावट पासपोर्ट असल्यावरून अटक केली. तो केरळला जात होता. विमानतळावर उतरल्यावर त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळचा पासपोर्ट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात करण्यात आले.