पुढील तीन दिवसांत तुरळक पाऊस शक्य

0
28

येथील हवामान खात्याने राज्यात येत्या 7 नोव्हेंबरला पावसाची शक्यता व्यक्त केली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, राज्यात 4 ते 6 नोव्हेंबर या काळात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील चोवीस तासांत फोंड्यात केवळ 0.2 मी.मी. पावसाची नोंद झाली. राज्यात चोवीस तासांत मुरगाव येथे कमाल तापमान 31.8 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले.