Home Featured पुढील आठवडाभर उष्णतेची लाट नाही : हवामान खाते

पुढील आठवडाभर उष्णतेची लाट नाही : हवामान खाते

0

राज्यात पुढील आठवडाभरात उष्णतेच्या लाटेची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले असून, या काळात कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअस ते 36 अंश सेल्सिअस एवढे असेल, तर पुढील दोन दिवसांत या तापमानात कोणतीही वाढ होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतर तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

गेल्या 24 तासात पणजी शहरात कमाल तापमान 34.3 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 26.5 अंश सेल्सिअस एवढे होते. मुरगाव तालुक्यात कमाल तापमान हे 34.4 अंश सेल्सिअस व किमान तापमान हे 27.7 अंश सेल्सिअस एवढे होते.