जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कर्तव्य बजावत असणार्या दोन लष्करी अधिकार्यांना वीरमरण आले आहे. तर अन्य पाच जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. वीरमरण आलेल्यांमध्ये लष्करातील एक कॅप्टन आणि एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा समावेश आहे. हल्ल्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.