पी. टी. उषा यांच्यासह चौघांची राज्यसभेवर निवड

0
12

राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावे जाहीर झाली आहेत. ही चारही नावे दक्षिण भारतातली आहेत. धावपटू पी. टी. उषा, प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचे वडील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांचे अभिवादन केले आहे.