पीएचडी विद्यार्थ्याची पत्नी दोनापावलहून बेपत्ता

0
63
आशा पागारे (२७) ही आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार रविकिरण पागरे या दोनापावल येथे गोवा विद्यापीठाच्या क्वार्टर्समध्ये राहणार्‍या पीएचडी विद्यार्थ्याने पणजी पोलिसात नोंदवली आहे. गेल्या २४ रोजीपासून ती घर सोडून निघून गेलेली असून तेव्हापासून बेपत्ता असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

चार वर्षांपूर्वी आपण तिच्याशी लग्न केले होते व आपणाला ३ वर्षांचा एक मुलगाही असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, आशा पागरे हिने घर सोडून जाताना मागे एक पत्र लिहून ठेवलेले असून आपण जीवनाला कंटाळून निघून जात असल्याचे त्यात नमूद केले आहे. एक पानी पत्रात तिने बरेच काही लिहिलेले असून जीवनाचा आपणाला कंटाळा आलेला आहे व मरणाची आपणाला भीती वाटत असल्याचेही म्हटले आहे. आपल्या मागे कुणालाही पोलिसांनी त्रास देऊ नये, अशी विनंतीही तिने केली आहे.