पिळर्णमधील कंपनीला लाखो रुपयांना गंडविल

0
8

>> पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल

पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीची फसवणूक करून लाखो रुपये आपल्या खात्यात वळवून घेतल्याची तक्रार पर्वरी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे.
निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार पिळर्ण येथील पीईसी व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीचे फायनान्स व अकाउंट प्रमुख प्रदीप अग्रवाल यांनी वरील कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक (अकाउंट फायनान्स) पदावर काम करणाऱ्या सुकृती हरेश दोशी (ठाणे, महाराष्ट्र) हिने कंपनीचे 3,14,420 रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. त्यानंतर 2,81,795 रुपये अमन कुमार यांच्या खात्यात तसेच या कंपनीत खरेदी अधिकारी पदावर काम करणारे पंकज श्रीवास्तव (साळगाव, मूळ दिल्ली) यांच्या नावावर 97,600 रुपये जमा केले. वरील व्यवहार 1 सप्टेंबर 22 ते 30 नोव्हेंबर 23 या कालावधीत झाला असून तिघांच्या खात्यात एकूण 6,93,815 रुपये वळवण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या विषयी अग्रवाल यांनी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी संशयितांवर भा. दं. सं. 408 (34) कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मळीक पुढील तपास करीत आहेत.