29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

पित्तावर घरगुती उपाय…

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील अँटासिड्‌स ही निष्फळ ठरतात. तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्कीच आजमावून पहा.

* आरामदायी केळं – केळातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो. त्यामुळे पोटात अम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.
– पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्ल्याने आराम मिळतो. केळातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.
* फायदेशीर तुळस – तुळशीमधील अँटीअल्सर घटक पोटातील/ जठरातील अम्लातून तयार होणार्‍या विषारी घटकांपासून बचाव करते.
– तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.
* अमृतरूपी दूध – दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक अम्लनिर्मिती थांबते व अतिरिक्त अम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.
– दूध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्याच चमचाभर तूप घातल्यास ते हितावह ठरते.
* बहुगुणी बडीशेप – बडीशेपमधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.
– बडीशेपचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
* पाचक जिरं – जिर्‍याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते ज्यामुळे पचन सुधारते, चयापचय सुधारते आणि शरीरातील वायू वा गॅसचे विकार दूर होतात.
– जिर्‍याचे काही दाणे केवळ चघळल्यानेसुद्धा आराम मिळतो. किंवा जिर्‍याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.
* स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग – लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते, पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात.
– जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. या रसामुळे पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घशातील खवखवही कमी होते.
* औषधी वेलची – आयुर्वेदानुसार वेलची शरीरात वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.
– पित्तापासून आराम मिळण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट/सालीशिवाय) ती पाण्यात टाकून उकळा. हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने तात्काळ आराम मिळेल.
* वातहारक पदिना – पदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. पदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरही पदिना गुणकारी आहे. पदिन्यातील मेन्थॉल पचनास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.
* आल्हाददायक आलं – आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसामुळे आम्लपित्त कमी होते.
– पित्तापासून आराम मिळण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या. किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गुळ टाकून चघळत रहा.
* पित्तशामक आवळा – तुरट, आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तानाशक असून त्यातील विटामिन-‘सी’ अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. – रोज चमचाभर आवळ्याची पावडर/ चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व षड्‌रस मिळतात.

 

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

स्तन कर्करोग जनजागृती

डॉ. मनाली पवार भारतात स्तनाचा कर्करोग सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. स्त्रियांमधील कर्करोगांपैकी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ते ३२...

अर्धशिशीवर होमिओपॅथी

डॉ. आरती दिनकर १६ वर्षांचा मुलगा यश. त्याला ‘मायग्रीन’ म्हणजेच अर्धशिशीचा त्रास होता म्हणून तो होमिओपॅथीच्या उपचारांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये...

महती भारतीय संस्कृतीची

योगसाधना - ५२४अंतरंग योग - १०९ डॉ. सीताकांत घाणेकर आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा, त्यावेळच्या...

‘दमा’वर होमिओपॅथीच हितकर

डॉ. आरती दिनकरहोमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशकपणजी वारंवार होणारी सर्दी, शौचास साफ नसणे, अपचन, स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे विकार, मन:क्षोभ, हवेतील फेरफार,...

‘विद्या विनयेन शोभते’

योगसाधना - ५२३अंतरंग योग - १०८ डॉ. सीताकांत घाणेकर आपले पूर्वज किती थोर होते ज्यांनी...