विद्युत खात्याचे कनिष्ठ अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणी नुवेचे आमदार मिकी पाशेको यांच्या पर्यवेक्षण कालावधीवरील (प्रोबेशन) मुक्ततेच्या आदेशाला काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सादर केलेली फौजदारी फेरतपासणी याचिका सोमवार दि. १७ डिसेंबर रोजी सुनावणीस येण्याची शक्यता आहे.
प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर ऍक्टच्या कलम ४ (२) नुसार प्रोबेशन अधिकार्याकडून अहवाल येणे बंधनकारक असताना सदर अहवाल न मागवताच दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सक्त ताकिद देत प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर ऍक्टचा फायदा मिकी पाशेकोंना १३ डिसेंबर रोजीच्या निवाड्यावेळी देत त्याना मुक्त केले. सदर निवाड्याला ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आव्हान दिले आहे.

