पावसाळ्यात होणारे रोग

0
607

–  डॉ. भिकाजी घाणेकर
एप्रिल- मे महिन्यात डास न होण्यासाठी उपाय केले नाहीत तर अतिसार, कॉलरा, विषमज्वरासारखे रोग होतात. जूनच्या नंतर काहीच करता येत नाही कारण सगळीकडे पाणीच पाणी झालेले असते. लहान मुले, गरोदर स्त्री, स्तनपान करणारी स्त्री आणि ६० वर्षे वयावरील वृद्ध ह्यांची जास्त काळजी घ्यावी.
पावसाळा सुरु झाला की अनेक रोग होण्याची शक्यता वाढते. पावसाळा हा गोव्यातील जास्त रोग आढळणारा काळ असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. पावसाळ्यात होणारे रोग टाळण्यासाठी एप्रिल-मे ह्या काळात जास्तव काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ ः पुर्वी कौले असायची ती साफ करून परत मांडली जात, म्हणजे पावसाळ्यात पाणी घरांत अजिबात येत नसे. आपल्या कोंकणी भाषेत ह्याला ‘घर शिवणे’ असं म्हणायचे. आता मुलाला सांगितले तर ते विचारणार- ‘‘घर काय ‘सुई सूत’ घेऊन शिवायचे?’’
पावसाळ्यापूर्वी करण्याची महत्वाची कामे :-
१) गच्ची (टेरेस) असेल तर तिथे पाणी साठणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
२) घराभोवतालच्या मोकळ्या जागेत बाटल्या, रिकामे डबे, नारळाच्या करवंट्या, नळ्या, टायर, बोंडे (नारळाचे) इ. काढून साफसफाई करावी कारण त्यात पावसाचे पाणी साठून तिथे मच्छरांची पैदास होते. कुळागरांतून बेड्यांचे होड्यासारखी आवरणे.
३) घराचे, हॉटेलचे काम (बांधण्याचे) पावसाळ्यात चालू असेल तर तिथे पाणी साठून राहणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. ‘क्यूवरींग’ वॉटर्स म्हणजे सिमेंट-विटा घट्ट व्हाव्यात म्हणून साठवलेल्या पाण्यावर घर बांधणार्‍या मालकाने जंतुनाशकाचे फवारे मारले पाहिजेत म्हणजे तेथे डासांची पैदास होणार नाही. हे काम घर बांधणार्‍या मालकाने केले नाही तर त्यास आरोग्य अधिकार्‍यातर्फे दंड आकारला जातो. गोवा सरकारने ह्यासंबंधी एक कायदा करून गॅझेटवर प्रसिध्द केला आहे.
४) घरावरती एक ‘ओव्हरहेड टँक’ असते ती सील्ड असावी. नाही तर त्यात मच्छर अंडी घालून डांसांची पैदास होऊन मलेरिया व डेंग्यूज्वर निर्माण होऊ शकतात. एक मच्छर किंवा  डास एक महिना जगतो. फक्त डासाची मादी माणसाना किंवा जनावराना चावते. रक्त मिळालं तरंच ती अंडी घालू शकते. नर- डास घरांत येत नाही. तो आंब्याचा गर, फळांचा रस इत्यादी पिऊन जगतो. एक डास (मादी) एकदा वा दोनदा ३०० अंडी घालते. एक अंडी त्याची लार्वा- अळी बनते नंतर प्यूपा व आठ दिवसानी मच्छर बनून उडून जाते. ही भारतातली सर्वात जास्त मोठी इंडस्ट्री असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
* दूषित पाण्यापासून होणारे रोग- दूषित अन्न व माशी
१) अतिसार : अतिसार हा लहान मुलाना जास्त प्रमाणांत होतो. त्यांचीच लवकरांत लवकर काळजी घेतली पाहिजे. ओआरएस पाकिट, ग्लुकोज पाणी इत्यादी द्यावे.
स्वच्छता राखली तर हा रोग होणार नाही (घर व भोवतालची) ओआरएस बनवण्याची कृती – एका कपात पाणी घ्यावे. त्यांत एक लहान चमचा साखर घालावी व चिमूटभर मीठ. हा घोळ मुलाला चमच्याने थोडा थोडा देत रहावा. उलटी असेल तर मात्र लवकरात लवकर डॉक्टरला दाखवा. त्या मुलाला सलाईन डोस द्यावा लागतो. (ग्लुकोज.
२) कॉलरा (पटकी) – पूर्वी हा रोग फार प्रमाणात व्हायचा. दूषित पाणी हे त्याचे मूळ कारण. आता स्वच्छ पाणी व त्या रोगाविरुध्द ‘लस’ उपलब्ध आहे. गरजेनुसार ही लस देण्यात येते.
३) हेपॅटायटीस (ए, बी, सी) हा रोग दूषित अन्न व पाणी यांमुळे होतो. हेपॅटायटीस-बी मात्र दूषित रक्त किंवा दूषित सिरींज व सुईमुळे यकृताचे इन्फेक्शन(दाह) होऊन कावीळ, उलट्या, अतिसार इ. लक्षणे दिसून येतात.
आता – सध्याच्या काळात ह्या रोगावर एक लस उपलब्ध आहे. आणि ही लस सर्व मुलांना एक वर्षापूर्वी द्यावी.
४) विषमज्वर (टॉयफाईड) – सालमोनेला टायफॉय ह्या रोगजंतुपासून होतो. दूषित पाणी व दूषित जेवणखाण ह्यामुळे त्याचा प्रसार होतो. आता सध्या या रोगावर एक लस उपलब्ध आहे, ती लस सर्व मुलांना एक वर्षापूर्वी द्यावी.
५) पोलियो – लक्षणे ः- ताप व हात किंवा पाय वांकडा होऊन चालण्यास त्रास होता. ह्या रोगावर प्रभावी लस पोलिओ  – पल्स पोलिओ कार्यक्रमानुसार भारतात हा रोग फार कमी प्रमाणात आढळतो. १९७५ साली स्मॉल पॉक्स- देवी हा रोग संपुर्ण जगातून नाहीसा झाला. ह्याला जागतिक आरोग्य संघटनेने ‘एक वैज्ञानिक चमत्कार’ म्हटले आहे.
६) आमांश (डिसेंटरी) – या रोगात रक्तमिश्रित आव पडणे, पोटात मुरडा होणे, थोडा ज्वर येणे व वारंवार शौचाला होणे ही लक्षणे असतात. मल अल्प पडतो. अमिबा ह्या रोगजंतूपासून हा रोग होतो. आता प्रभावी औषधोपचार उपलब्ध असल्याने तसेच स्वच्छतेमुळे ह्या रोगाचे प्रमाण फारच कमी झाले आहे. दूषित पाणी अन्न व माशी ह्यामुळे हा रोग पसरतो.
डासांपासून होणारे रोग व उपाय –
रोग डांस अंडी घालण्याची जागा लक्षणे लस उपचार
मलेरीया आनोफेलीस स्टिफेंसाय बांधकाम (घराचे क्युरिंग वॉटर) ताप, अंग दुखी उलटी नाही रक्त तपासून उपचार
फायलेरि
या हत्तीरोग क्युलेक्स फातोगन्स गटार (सेप्टीक टँक) हात, पाय, स्तन (ब्रेस्ट सूज) नाही हेट्राझॉन   गुळ्या
जपानी मेंदूज्वर क्यूलेक्स पावसात शेतांत साठलेले पाणी ताप, उलटी फिट्‌स प्रभावी लस उपलब्ध लहान मुलांना ड्रीप द्यावी
डेंग्यू चिकन गुनीया एडीस एजीप्ती लाता, बाटल्या टायर, बोंडे ओव्हरहेड टँक रक्तस्त्राव ताप रक्तातील प्लेटलेट्‌स कमी होऊन नाही रक्तस्त्राव बंद करावा. रक्ताची गरज लहान मुलांना पडू शकते महत्वाच्या सुचना – एडिस एजिप्ती दिवसा चावतात. सर्व डांस (मादी) घरांत संध्याकाळी ६ ते ७ या वेळात येतात म्हणून त्यावेळी घराच्या दारं, खिडक्या बंद कराव्यात.
लहान मुलांना मच्छरदाण्या व धूप (टॉक्सीक नसतो) वापरावा.
* महत्वाच्या टीप्स ….
– पुर्वीच्या काळी घर शिवायचे. आताही काळजी घेतली पाहिजे. मार्च, एप्रिल महिन्यात डास न होण्याचे उपाय केले नाहीत तर वरती दाखवल्याप्रमाणे रोग होतात. जूनच्या नंतर काहीच करता येत नाही कारण सगळीकडे पाणीच पाणी झालेले असते. जानेवारी, फेब्रुवारी, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या काळात पावसात होणारे रोग त्यांचे प्रमाण फार कमी असते.
– लहान मुले, गरोदर स्त्री, स्तनपान करणारी स्त्री आणि ६० वर्षे वयावरील वृद्ध (सिनीयर सिटीझन्स) ह्यांची जास्त काळजी घ्यावी कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.