राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील व्यवसायांना व्यापार परवाना किंवा त्यांचे नूतनीकरण 24 तासांत केले जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक नगरपालिका संचालकांनी जारी केले आहे. चोवीस तासांत परवाना न दिल्यास तो दिल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे. परवान्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर तात्काळ परवाना दिला जाणार आहे. पंचायत क्षेत्रातील व्यापार परवाना प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आल्यानंतर नगरपालिका क्षेत्रातील प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे.

