पार्सेतील टेम्पो-स्कूटर अपघातात एक ठार

0
12

पार्से येथे काल गुरूवारी टेम्पो व स्कूटरमध्ये झालेल्या अपघातात रामू बाबू येडगे (३९) याचा मृत्यू झाला. काल सकाळी ११.३० च्या सुमारास एमएच १० बीआर ०३२४ हा टेम्पो पेडणेहून चोपडेच्या दिशेने जात होता. तर जीए ०३ एस ९२९८ या स्कूटरने रामू येडगे हा चोन्साय-पार्से येथून पेडणेच्या दिशेने येत असताना दोन्ही वाहनात अपघात झाला. त्यात रामू गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला शिवोलीतील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले.