पार्थ चॅटर्जी यांची अखेर मंत्रिपदावरून हकालपट्टी

0
32

>> मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या पार्थ चॅटर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल त्यांची मंत्रिपदावरून उचलबांगडी केली.

ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी होत होती. त्याचीच दाखल घेत काल ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर काही वेळातच त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे आदेश जारी झाले. पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये उद्योग, वाणिज्य आणि उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री होते. मंत्रिपदावरून त्यांना दूर केल्यानंतर त्यांच्या विभागांची जबाबदारी आता ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. २०१४ मध्ये चॅटर्जी यांच्याकडे शिक्षण खाते होते, त्यावेळी हा घोटाळा झाला होता, त्यामुळे त्यांना ईडीने अटक केली आहे.