पाण्यावरून धावणाऱ्या मेट्रोचे उद्या केरळमध्ये उद्घाटन

0
5

पश्चिम बंगालमध्ये मेट्रो पाण्याखाली धावण्यासाठी सज्ज असतानाच आता केरळमध्ये पाण्यावरुन मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिला वॉटर मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. देशातील पहिली वॉटर मेट्रो केरळमधील कोचीमध्ये सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवार दि. 25 एप्रिल रोजी तिरुवनंतपुरम येथून या सेवेचे उद्घाटन करणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा केरळचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले आहे. कोची वॉटर मेट्रो पोर्ट सिटीसाठी तब्बल 1 हजार 136 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत कोचीच्या आसपास असलेली 10 बेटे जोडली जाणार आहेत.