पणजी शहरात प्रवेश करण्यासाठी वापरण्यात येणारा पाटो पूल दुरुस्तीच्या कामामुळे काल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. परिणामी वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागली होती. पाटो पुलाची एक बाजू दुरुस्तीच्या कामानिमित्त येत्या 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवली जाणार आहे.