पाटकरांच्या याचिकेनंतर प्रतिवादींना नोटिसा

0
10

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने प्रतिवादी सभापती व इतरांना नोटीस पाठवली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमित पाटकर यांनी दोन आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन ती प्रथम निकालात काढण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर, आठ आमदारांच्या अपात्रता प्रकरणी दाखल दुसऱ्या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार आहे. सभापती हे घटनात्मक पद असून त्यांना निर्देश दिला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद सभापतींच्यावतीने न्यायालयात करण्यात आला.