जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. परिणामी अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील भारतात बंदी घालण्यात आली आहे. यातच आता भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल देखील भारतात बंद केले आहे. शहबाज शरीफ यांच्या चॅनलबरोबरच प्रसिद्ध पाकिस्तानी ड्रामा चॅनल जसे की हम टीव्ही आणि एआरवाय डिजीटल यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. हे चॅनल देखील आता भारतात यूट्यूबवर पाहाता येणार नाहीत. केंद्र सरकारने यापूर्वी माहिरा खान, हानिया आमिर आणि साजल अली अशा अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली होती.

