पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात २३ दहशतवादी ठार

0
102

पेशावरमधील विद्यार्थ्यांच्या हत्याकांडानंतर पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून शुक्रवारी रात्री उत्तर वझरीस्तानातील दहशतवादी तळांवर लष्कराने चढवलेल्या हवाई हल्ल्यात २३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या हल्ल्यानंतर एका बोगद्यात दहशतवाद्यांनी लपविलेला मोठा शस्त्रसाठा लष्कराच्या हाती लागला. उत्तर वझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून दहशतवाद्यांविरोधात तीव्र मोहिम सुरू करण्यात आली आहे.