विमानास उशीर केल्याचा आरोप करत काल पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रेहमान मलिक यांना प्रवाशांनी विमानात येण्यापासून मज्जाव केला त्यामुळे त्यांना परत जावे लागले. यावेळी मलिक यांच्याबरोबर सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे हिंदू खासदार होते. इस्लामाबादला जाण्यासाठी कराची विमानतळावर थांबलेल्या विमानास अडीच तास उशीर करण्यात आला. त्यानंतर तेथे मलिक व खासदार डॉ. रमेश कुमार वाकवानी पोचले. त्यावेळी प्रवाशांनी दोघांवर विमानास उशीर केल्याचा आरोप करून त्यांना माघारी पाठवले.