हा वाद अधिक न वाढवता मिटविण्यासाठी दोन्ही देशांनी संकेतांनुसार एकामेकांशी संपर्क साधला. नंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही भारतीय परराष्ट्र मंत्रालयास हा वाद मिटल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, हवाई हद्दीत शिरल्यानंतर हेलिकॉप्टर उतरवायला लावून त्यातील चार जणांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले.
त्यांना सुखरूप ठेवले असून त्यांची केवळ चौकशी केल्याचे सांगण्यात आले होते. त्यात एक कर्नर, दोन मेजर आणि एक कर्नल अधिकार्याचा समावेश होता. भारतीय लष्कराच्या म्हणण्याप्रमाणे बिघडलेल्या हवामानामुळे भारताचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर पाकव्याप्त सीमेत गेले. ते लेह येथून भिमघाट येथे लष्कराच्या हवाई तळावर परतत होते.
भारत-पाक सैन्यात गोळीबार
शनिवारी रात्री पाकिस्तान सैन्याकडून अचानकपणे भारतीय सैन्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सुमारे दोन तास गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करता यावी यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याची शक्यता आहे.
भारतीय जवानांना गस्त घालतेवेळी रात्री १० वा. काहीजण पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीतून अनधिकृतपणे घुसत असल्याचे निदर्शनास आले. बरोबर तेवढ्यातच पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला. त्यास भारतीय सैन्यानेही उत्तर दिले. लष्करातील सूत्रांनुसार पाकिस्तान व्याप्त काश्मीरात सुमारे ४२ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे असून त्यात ३ हजार दहशतवादी प्रशिक्षण घेत आहेत. बर्षवृष्टी होऊन डोंगराळ भागांतले मार्ग बंद व्हायच्या आधी दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत.