पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी

0
29

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुजरानवाला इथे गोळीबार झाल्यामुळे ते जखमी झाले आहेत. गुजरानवाला येथे एका रॅलीदरम्यान हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या उजव्या पायाला जखम झाली आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आले असून या घटनेतएकाचामृत्यू झाला असून सातजण जखमी झाले आहेत. या घटनेतील हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे समोर आले असून त्यातील एका संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरले आहे.

एके ४७मधून गोळीबार
या गोळीबारात इम्रान खान यांच्याशिवाय माजी गव्हर्नर इम्रान इस्माईल हेही जखमी झाले आहेत. एके ४७मधून हा गोळीबार झाला असून त्यात रायफलधारी हल्लेखोराचा चेहरा समोर आला आहे. तसेच या संबंधिचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली आहे. तसेच या गोळीबारात त्यांच्याशिवाय पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अनेक नेते जखमी झाले आहेत.