Home बातम्या पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

0

पंतप्रधान मनमोहन सिंग व यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी जम्मू काश्मीर दौर्‍यावर असतानाच काल पाकिस्तानी फौजांनी पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेकडून भारतीय चौकीवर गोळीबार केला. जूनमध्ये पाकिस्तानकडून झालेले हे शस्त्रसंधीचे चौथे उल्लंघन आहे.

हा गोळीबार काल दुपारी ३.१५ वा.सुमारास झाल्याचे संरक्षण खात्याच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. नंतर भारतीय जवानांनीही प्रत्युत्तरदाखल गोळीबार केला. दरम्यान या गोळीबारात जीवितहानी झाली नाही.या महिन्याच्या सुरुवातीस पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता.