Home बातम्या पाकला हरवून भारत ‘चॅम्पियन्स’

पाकला हरवून भारत ‘चॅम्पियन्स’

0

भारताचे नवे कोच मायकल नॉब्स यांची ही पहिलीच स्पर्धा होती. सामन्याच्या ठरलेल्या वेळेपर्यंत दोन्ही संघांनी कमालीची चुरस राखत एकमेकांना एकही गोल करू दिला नव्हता. पण पेनल्टी शुटआउटमध्ये कर्णधार राजपाल सिंह , दानिश मुज्तबा , युवराज वाल्मीकी आणि सरवनजीत सिंह यांनी गोल केले.

पाकिस्तानसाठी मोहम्मद रिजवान, वसीम अहमद यांनी गोल केले. यापूर्वी लागोपाठ होत असलेल्या अपयशी कामगिरीमुळे हॉकीमध्ये टीम इंडियावर टीका होत होती. त्यामुळे या विजयामुळे पुन्हा नव्या आशा जागवल्या आहेत.