पाऊस गायब;उष्णता वाढली

0
29

राज्यात मागील तीन-चार दिवसांपासून पाऊस मंदावला आहे. चोवीस तासांत केवळ 3.5 मि.मी. एवढ्या अल्प प्रमाणातील पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली असून चोवीस तासांत पणजीत कमाल तापमान 32.5 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले. राज्यात मागील चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील दोन दिवसांत केवळ 12.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत एकूण 35.51 इंच पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण कमी असले तरी सोसाट्याचा वारा वाहत असल्याने पडझडीच्या घटनांची नोंद होत आहे. चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या 24 घटनांची नोंद झाली. त्यात 1 लाख 45 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला.